मला जगायचंय..!
मला जगायचंय..!
जीवनाचा प्रवास,
शून्यातून शून्याकडे जाणारा,
कधी धन तर कधी ऋण होऊन,
मागे पुढे होणारा,
त्या प्रवासात मला,
मागे पुढे व्हायचंय….
कधी हरायचंय कधी जिंकायचंय
मला जगायचंय…
जीवनापेक्षा जास्त..
मला जगायचंय..!
जीवनाचा प्रवास हा,
कधी जंगल तर कधी घर,
कधी खाली तर कधी वर,
कधी दरी तर कधी डोंगर,
प्रत्येक कपारी आणि शिखर,
हिमालयापेक्षा जास्त उंच,
मला सर करायचंय..!
मला जगायचंय…
जीवनापेक्षा जास्त..
मला जगायचंय..!
जीवनाचा प्रवासात,
मोरपंखातल्या रंगांसारखे,
आभाळतल्या ढगांसारखे,
एकमेकात मिसळून,
एकरूप होऊन,
जीवनातील सुख आणि दुःख,
यश आणि अपयश,
चांगले आणि वाईट,
अशा साऱ्या खिचडीचा,
आस्वाद घ्यायचाय मला…
पोट भरभरून नाही,
तर त्याहीपेक्षा जरा जास्तच..!
मला जगायचंय…
जीवनापेक्षा जास्त..
मला जगायचंय..!
#गंगाशिवकपुत्र
