श्रावण आला
श्रावण आला
थुई थुई नाचत, पिसारा फुलवत,
मयुरा गाई गाणे…म्हणे आला श्रावण आला.
सरी मागून सरी, येई भुईवरी,
सरी सांगते बाई… म्हणे आला श्रावण आला.
गार गार वारा, देई अंगाला शहारा,
आसमंत सारा… म्हणे आला श्रावण आला.
खळ खळ धारा, वाहे ओढा नदी झरा,
थेंब थेंब नीरा… म्हणे आला श्रावण आला.
चिऊ चिऊ चिमणी, सांगे लेकरा कहानी,
भरवीत दाने… म्हणे आला श्रावण आला.
हर हर शंभू, लागे जयघोष घुमू,
भान हरपून गणू… म्हणे आला श्रावण आला.
#गंगाशिवकापुत्र
