STORYMIRROR

Pradip Kasurde

Classics

4  

Pradip Kasurde

Classics

प्यारा आहे देश माझा

प्यारा आहे देश माझा

1 min
643

 

प्यारा आहे देश माझा 

भारत तयाचे नाव 

जात धर्म एक आम्हा 

इमान एकच ठाव ॥१॥


अनेक आमचे वेश 

अनेक आमच्या भाषा 

वेगवेगळा प्रांत जरीही 

तिरंगा एकच आशा ॥२॥


स्वातंत्र्य समता बंधुता 

मूल्य आमचे मानवतेचे 

दर्जा संधी समानता 

सूत्र साधले कल्याणाचे ॥ ३॥


ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान 

पाऊल पडते पुढे 

प्राणांची आहुती देवूनी 

सैन्य आमचे लढेे ॥४॥


देश रक्षण्या सज्ज आम्ही 

अजोड आमची एकात्मता 

कर्तव्य सारी पार पाडूनी 

देशात नांदू दे शांतता ॥५॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics