वीर सैनिक
वीर सैनिक
रक्षण करण्या मायभूमीचे
सज्ज सदा राहती हॊ
शान राखण्या तिरंग्याची
प्राण घेतले हाती हॊ ||1||
लढता लढता शत्रूसंगे
छिन्न हॊते छाती हॊ
कशास हवा स्वर्ग आम्हा
पवित्र इथली माती हॊ ||2||
तळहातावर शीर घेवूनी
मृत्यूला सामोरे जाती हॊ
विरून गेल्या किती ज्योति
काळ्या कभिन्न राती हॊ ||3||
शुरा तुला मीं वंदिले
प्रदीप गाथा गाती हॊ
व्यर्थ न हॊ बलिदान
सलाम तुम्हा साथी हॊ ||4||