STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Inspirational

4  

Dilip Yashwant Jane

Inspirational

उध्वस्त

उध्वस्त

1 min
158

स्वप्न हिरवे पाहिले

होते पिकही खुशीत

उन वाऱ्या संगे

होते आनंदाने गात


केला घात एकाएकी

रात्रीतून असा सारा

खिन्न उदास मातीत

वाहे निवांत हा वारा


कशी घालावी समज

माझ्या मनाचीच आता

झाले उध्वस्त सारेच 

अवकाळी सर येता


गेले वाहून शिवार

स्वप्न सारेच उध्वस्त

घास हिरावून देवा

केले मरण तू स्वस्त


बघतोच मी ही आता

कोण किती झुंझवतो

भेगाळल्या स्वप्नातही

नवी उमेद पेरतो


नाही मानणार हार

स्वप्न पेरेल नव्याने

आशावादी पुत्र तुझा

पुन्हा लढेल जोमाने


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational