संसार
संसार
1 min
433
गरिबीचा संसार
घेऊन पाठीवर
सोडला गाव
उध्वस्त किनार
वणवण फिरतांना
मायेचा ओलावा
पाझर फुटावा
हृदयाला दुष्काळात
दुःखाची किनार
जशी माझी
तशीच त्यांची
समजूत पामराची
संसार पाठीवर
पोरगी उपवर
चिंता मनाला
प्रत्येक क्षणाला
आजवर जगलो
कसा वाढलो
कळणे अवघड
मन ही जड
तसाच उठलो
चालत राहिलो
आसरा शोधण्यासाठी
निर्वासीत होउन
