STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Tragedy

4  

Dilip Yashwant Jane

Tragedy

मरणकळा - दिलीप जाने

मरणकळा - दिलीप जाने

1 min
285

तुला आता एकट्यानच 

सवय करावी लागेल जगायची


ज्या पंखांमध्ये तू बळ पेरलंस

आभाळ पेलण्याचं सामर्थ्य दिलसं

सक्षम केलस उभं राहायला

स्वतःच्या सामर्थ्यावर


ती पाखरं उडून गेलीत दूरवर

रमलेत आपल्या चिमण्यांसोबत

आपल्या हक्काच्या घरात

पोराबाळांसह मोठ्या सुबत्तेत 


हे ही उजाड उदास अवकळा आलेलं

मरणकळा भोगणारं एकाकी

घर तसं तुझ्या पूर्ण हक्काचं

पोरं असून वांझपण वाट्याला आलेलं


येथल्या रंग उडालेल्या भिंती 

सताड उघडी दारं अन् खिडक्या

अगदी तुझ्यागत ..

सारं काही तुझं...फक्त तूझंच


साठवत रहा त्यांना कितीतरी वेळ 

आपल्या थिजलेल्या डोळ्यात

दाटलेल्या आसवांच्या पडद्याआडून

गतकाळाच्या गोड स्मृती उजाळत


आठवत रहा खालेल्या खस्ता

आयुष्यभर उपसलेले कष्ट 

क्षणोक्षणी पचवलेले अपमान 

कोणाकोणासाठी माहित नाही


भिंतीवरल्या तसबिरीतून मात्र

बघताहेत दोन करूण डोळे

तुझी असहायता तडफड

अन् जीवाची होणारी घालमेल


शुन्य नजरेनं पहात राहतोस

अर्ध्यावर डाव मोडून गेलेल्या

त्या जीवनसाथीच्या तसबिरीकडे एकटक

कितीतरी वेळ गतस्मृती उजाळत


तशा आठवणीही उगळतात लख्ख 

मनःपटलात खोलवर दडलेल्या

अश्वत्थाम्याच्या भळभळत्या जखमेगत

खोलवर साचलेल्या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy