STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Others

3  

Dilip Yashwant Jane

Others

ज्ञानसूर्य

ज्ञानसूर्य

1 min
256

 भीमा तुझ्या लेखणीनं, बदलली सारी सृष्टी

आम्हा सार्‍या पामरांना, दिली नवी एक दृष्टी 


हक्कांसाठी लढलात, भोग संपवले सारे

श्वास मोकळा घेण्यास, साथ देई आता वारे 


रात्र भयाण काळोखी, किती पिढ्यांनी पाहिली 

ज्ञानसूर्य मार्गदाता, नवी पहाट दावली 


पाणी तळ्याचे पेटले, मंत्र दिलात मुक्तीचा 

ओंजळीत भीमा साऱ्या, जय नवीन क्रांतीचा 


केला मंदिर प्रवेश, सत्याग्रह तो करून 

लढा समतेचा न्याय, कसा जाऊ विसरून 


सर्व जाती धर्मासाठी, कार्य केलेत महान 

गाढे अभ्यासक बाबा, केले किती संशोधन 


ज्ञान सागर झालात, दिला शिक्षणाचा मंत्र 

द्रष्टे मार्गदाता तुम्ही, दिले मुक्तीचेही तंत्र 


अधिकार समतेचा, आम्हा दिला मिळवून 

अंधकार दाटलेला, गेला दूरचि पळून 


स्वाभिमान सामर्थ्याची, दिली करून जाणीव 

युगेयुगे समाजात, ज्याची होतीच उणीव


 ग्रंथ वृत्तपत्रातून, थोर मांडले विचार 

भारतीय घटनेचे, बाबा तुम्ही शिल्पकार 


Rate this content
Log in