STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Romance

4  

Dilip Yashwant Jane

Romance

कांता

कांता

1 min
305

सरली रात्र सारी स्वप्नात सखे तुझ्या

गाली अशी लाली रंगत भारी जमली

चंद्रमाच्या साक्षीनं मैफल अशी ही सजली

फास हातांचा भोवती सुंदर तुझा मखमली


मधाळ अधर घ्यावे किती शोषून सारे

गोडवा वाढत जाई क्षण सौख्याचे अधुरे

बेधुंद मन मोहरून धुंदित रजनी सारी

लख्ख चांदणे अंगणी स्वप्नी असे अस्तुरी


नशा आज असली कशी नयनी ही भासली

मुख लपवून ओंजळीत बळेच कौमुदी लाजली

चंद्रकोर पाहून नयनांची आभाळी चंद्रमाही हसला

गंध केसरी भाळी देई उल्हास मजला


लांब सुंदर वेणीत गंध मोगऱ्याचा अडला

मोद उसळून सारा श्वासा श्वासात भिनला

हलकेच साद घाली रव मधूर पैंजणाचा

मनी भास कसे हे कांता जवळी असल्याचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance