STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Tragedy

4  

Dilip Yashwant Jane

Tragedy

निर्लज्ज

निर्लज्ज

1 min
573

रस्त्यानं जातांना

सहज लक्ष गेलं

वळणावरच्या कोपऱ्यात

एका फाटक्या

जीर्ण कपड्यात

गुंडाळलं होतं

एक काटकुळं शरीर

गरिबीची असहायतेची

साक्ष देत

सांगत होत्या

हातापायावरच्या अन्

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या

सोशिकपणा त्या देहाचा

वस्त्रांच्या झालेल्या चिंध्यांनी

दाखवली गरिबी

वाईट वाटले... थोडेसे

नकळत हात 

खिशाकडे गेला

आठ आणे टाकले समोर

इतरांसारखे.... निर्लज्जपणे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy