स्वागत
स्वागत
1 min
288
नव्या वर्षाचे स्वागत
कसे सारे करतात
आमच्यासाठी दिवस असे
कायम कसे राहतात
रातदिन राबत असतो
बाप माझा शेतात
काळ्या आईच्या सेवेत
पिढ्या मात्र खपतात
हररोज असतो आम्हा
रोज नवा दिवस
पिकू दे धनधान्य
करतो सदा नवस
नाही येत दया तुला
कधी स्थिती दुष्काळी
येता पिक भरघोस
नेतो सारा अवकाळी
रोज नवी उमेद मनी
आप आपसात पेरतो
प्रत्येक दिन नवा म्हणून
स्वागत आम्ही करतो
