STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Others Children

3  

Dilip Yashwant Jane

Others Children

सखा

सखा

1 min
201

पिठूर चांदणे नीर झुळझुळे कुणास ठावे काय गाते गाणी

मस्त खळखळत झुळूझुळू धुंदीत मौजेत वाहते पाणी


गरगर गिरकी घेत भोवती सलिल धावते वळणावरती

तटावरचे तरू-ताटवे नभी झेपावत जळात स्व-रूप न्याहळती


लगबग करीत तरूस बिलगल्या नाजूक साजूक सुंदर लता

हसत खिदळत पुष्पे अर्पिती वाऱ्यासंगे हलता डूलता


किलबिल करीत नभी विहरती विहंग नाजूक इवलाले

प्राचीवरती रविरायाने बघ लाल-गुलाबी रंग उधळले


रविकिरणांचा साज सोनेरी विखुरता अथांग जळावरी

लाभे आगळी नितळ झळाळी अंबूद देई मज उभारी


अलगद मंजूळ गाणे येई अधरांवर पाहता अवघी ही नवलाई

किमयागार सखा निसर्ग माझा दावितसे अजबसी जादूई नवलाई


Rate this content
Log in