गर्द काळ्या नभातूनी
गर्द काळ्या नभातूनी


गर्द काळ्या नभातूनी
मंद धुके बावरते
हिरवा शालू नेसून
नभ खाली उतरते ॥1॥
शिट्टी घालतोय वारा
आवाज कुठून देतो
नदी नाले बांध ओढे
खळखळ नाद येतो ॥2॥
गोठ्यात हलती माना
थरथर अंगी झाली
सर्जा राजा कानी बोले
चल बग सुगी आली ॥3॥
कुठे कोणा बांधावर
गुरे निवांत चरती
पाण्यापाशी गाई गोरे
उगाच गुटमळती ॥4॥
रूप सृष्टीचे सारेच
काही क्षणात बदले
आगमन तुझे होता
पान न पान सजले ॥5॥