मन पाऊस पाऊस
मन पाऊस पाऊस


मन पाऊस पाऊस
मन पाऊस पाऊस
घेई वाऱ्यापरी वेग
नको जाऊस जाऊस
ओलांडून सारे मेघ ॥1॥
प्रीतीचा बहराचे थोडे
क्षण ते आठवून
परतीचा पाऊस थोडा
काळजात घे साठवुन ॥2॥
मोहरली सारी सृष्टी
मातीला कोंब यावे
क्षण सारे आठवणीचे
पापण्यात मिटून घ्यावे ॥3॥
थोड्या विजा चमकाव्या
आभाळ यावे दारी
हे गुज तुला उमजावें
कोसळाव्या सरीवर सरी ॥4॥