STORYMIRROR

Pradip Kasurde

Tragedy

3  

Pradip Kasurde

Tragedy

आई मला वाचव

आई मला वाचव

1 min
188

जग मला बघायचे आहे 

काळजात मला साठव 

तुझ्या पोटी जन्म घेते 

अगं आई मला वाचव ॥1॥


वंशाचा दिवा हवा सर्वा 

का ग यांना नको पणती 

घाबरून जावू नकोस तू 

मी आहे तुझ्या संगती ॥2॥


अशुभ आहे कन्यारत्न 

विचार यांचे किती जुने 

रोजच घडतात इथे 

भ्रूणहत्येचे पापी गुन्हे ॥3॥


जिजा सावित्री अहिल्या 

मीच जन्मले होते 

इंदिरा कल्पना मेरी 

गुणगान तिचे मी गाते॥4॥


माझ्यावरती जीव तूझा 

खूप खूप आहे आई 

हतबल करतात तुला ही 

माणसातले कसाई ॥5॥


मुलगी वाचवू निर्धार करू

एकत्र येवून सारे 

स्वागत करूनी माझे 

मुलगी शिकवा द्या नारे ॥6॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy