STORYMIRROR

Pradip Kasurde

Romance

3  

Pradip Kasurde

Romance

सांजवेळी तू अशी

सांजवेळी तू अशी

1 min
176

सांजवेळी तू अशी

लगबगीने येऊन जा

धुंद धुंद आठवणी

मागे मला ठेवून जा


एकदा आली अशी तू

वारा जसा वावटळी 

आयुष्य माझे गुंफले 

या अशा सांजवेळी


गाव होता शांत शांत

गुरे चालली गोठ्याकडे

दूर कुठे माळराणी

सूर्य डोंगराआड दडे


आठवण तुझी येता

ही सांज मधुर गाते 

जणू पृथ्वी अन सूर्याची

मिठीच सैल होते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance