STORYMIRROR

Rahul Salve

Romance

3  

Rahul Salve

Romance

सैराट

सैराट

1 min
309

तुझ निळ हे आकाश

माझ्या सोबतीला यावं

प्रिये फिरून हे सारे रान

प्रेमगीत गात जावं


बहर लागला फुलाला

रंगीत झाल बघ जिण

वास प्रितीचा दरवळ

मनी साठल ग गाणं


नागमोडी वाटेची ग ही

जादू अशी भारी ग

तुझ्या पाऊलवाटेला राणी

मी सैराट सुटाव


झुळझुळ करती पाणी

त्यात गारवा प्रेमाचा

तृप्त झाल हे काळीज

जणू झरा हा नात्याचा


मन पाखरू होऊन

सैरावैरा उडावं

उंच झेप घेऊनिया

राणी आकाश गाठावं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance