STORYMIRROR

Rahul Salve

Inspirational

4  

Rahul Salve

Inspirational

बुद्धपौर्णिमा

बुद्धपौर्णिमा

1 min
539

धन्य जाहली वैशाखी पौर्णिमा

सम्यक सम्बुद्ध सिद्धार्थ जन्मला

विश्वशांतीचा उद्गाता जगी

संदेश प्रेमाचा घेऊनी आला


अष्टांग मार्गाची शिकवण देऊनी

मानव कल्याणता रुजवुनी

धम्मज्योत पेटविली जगात

पंचशीलाचे पाजले पाणी


खीर प्राशुनी सुजाताची 

बोधीसत्वाची प्राप्ती झाली

बोधीवृक्षाची महती कळली     

ज्ञानप्रकाशाची कळी उमजली    

           

तपश्चर्येचा मार्ग स्विकारुन                  

दु:खाचे मूळ सांगून गेला

ध्यानप्राप्ती करुन जीवनी

देह चंदनासम झिजवला


बुद्धविहारी मिळते शांती

ञिशरणाची ती मंजुळवाणी

स्पर्श करुनी जाती मनाला

स्तुप हा बुद्धाचा महान जगी


काव्यफुले वाहतो गौतमाला

ञिवार वंदन तथागताला

दिक्षा अमुल्या मिळाली आम्हाला

जीवन सार्थक झाले मानवाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational