फक्त तू
फक्त तू
खेटलीत वादळे अनेक माझ्या
आयुष्याच्या किनाऱ्यावर
परतून लावल्या भव्य लाटा
तू माझ्या जीवनात आल्यावर
सोसलेत वादळी संकट
तमा नाही केली जीवाची
उभा करून संसार सारा
वाट चालली काट्याची
तुझा हातभार लाभला
माझ्या प्रत्येक कार्यात
फुलला हा नंदनवन
दोघांच्याही मनात
पावलोपावली मला अशी
साथ तुझी आता मिळावी
जगण्यालाही फुटेल पालवी
फक्त तू सोबत असावी

