STORYMIRROR

Rahul Salve

Tragedy

4  

Rahul Salve

Tragedy

शिर्षक :- "सांगाना हो....आई - बाबा मरण इतकं स्वस्त झाल का हो..."?

शिर्षक :- "सांगाना हो....आई - बाबा मरण इतकं स्वस्त झाल का हो..."?

1 min
373

नुकतच आईच्या पोटातून जन्म घेतल्यावर

मला या काचेत तुम्ही आणून टाकल...

मला वाटल आपल घरचं आल की काय?

ही मऊ मऊ गादी ,काचेचा हा बेड

गरम वाफेत मी पडलेलो

भोवताली रंगीबेरंगी लाईट

हे सगळ बघून वाटायचं की

या दुनियेत ही स्वागताची एक तऱ्हाच आहे...

जन्मल्यावर आईच्या कुशीत राहायचं

बाबांच्या पोटावर लोळायच...

सगळ्या कुटुंबात लाडके म्हणून मिरवायच

असा विचार मनात आल्यावर

खूप खूप आनंद वाटायचा...

पण इथ अंगाला सुई टोचल्यावर 

खूप खूप दुखायच...


सारखं सारखं माझ मन तेव्हा

माझ्या आईकडे वळायचं...

पांढरे कपडे घातलेले डॉक्टर मामा

अन् मला सांभाळणारी नर्स मावशी

नेहमी माझ्याशी बोलायचे, मला खेळवायचे...

तेव्हा सवंगड्यासारखे मला ते वाटायचे...

सार काही ठीक होत 

पण... अचानक डोळ्यांसमोर धूर पसरला

सगळ्या माझ्या घराने पेट घेतला

जिथ मी मोकळा श्वास घ्यायचो

तिथं मी गुदमरायला लागलो

लालबुंद चटके खायला लागलो

व्याकुळ मनाने रडायला लागलो

आई आई म्हणत ओरडायला लागलो...


वाचवा वाचवा म्हणत साद घालायला लागलो...

इतकी भयाण परिस्थिती 

आमच्या नशिबी आली...

जग पाहण्याची , मजा करण्याची संधी

आमच्याकडुन नियतीने हिरावून नेली...

काय या कोवळ्या मनाचा आमचा गुन्हा

हे जग मिळेल का बघायला पुन्हा ?

त्याच क्षणी हे डोळे मिटले

आई बाबाला अश्रू दाटले...

परत या जगात याच आईच्या पोटी

मी जन्म घेईल का हो?

परत एकदा तूमच प्रेम

माझ्या नशिबी येईल का हो?

निष्पाप जीवालाही सोडलं नाही त्यान

सांगाना हो खरच ...

आई - बाबा मरण इतकं स्वस्त झाल का हो...?

आई - बाबा मरण इतकं स्वस्त झाल का हो...?



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy