Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Rahul Salve

Inspirational

3  

Rahul Salve

Inspirational

स्वातंत्र्य दिन

स्वातंत्र्य दिन

1 min
232


स्वातंत्र्याची सुवर्ण सकाळ

देई स्फूर्ती भारतीयांत

त्याग आणि बलिदानाची

जाणीव राहील मनात


नंदनवनपरी नटलेले काश्मिर

प्रत्येकाचा जीव की प्राण

दुष्मनांच्या गोळीचा मार

झेलताहेत इथले जवान


स्वातंत्र्य, समता व बंधुता

देई देशभक्तीचा मान

त्यातूनच घडेल उद्याचा

माझा भारत देश महान


सुजलाम सुफलाम या भूमीवर

करूया चला नवनिर्माण

जातीभेदाच्या भिंती तोडून

तिरंग्याचा राखू मान


विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्रांतीने

घडेल उद्याचा महासत्ता भारत

विजयपताका भारत भूमीची

मग फडकेल डौलाने जगात


Rate this content
Log in