STORYMIRROR

Rahul Salve

Inspirational

3  

Rahul Salve

Inspirational

अंकुराची कहाणी

अंकुराची कहाणी

1 min
257

भेगाळल्या मातीमधी

माझी जिंदगाणी सारी

वर उनाड जीवन

बहर आला शिवारी 


पाणी पावसाची वाट

रोज पाहतोय शेतकरी

वाचवण्या माझा अंकुर

स्वतःला टांगतो जिव्हारी


रात्रंदिन करून आटापिटा

पुरवतोय रसद पाणी

वाचा जरी नाही मला

खुलवतो माझी जिंदगाणी


उमेद शेतकरी राजाची

बहरून यावी या शिवारी

भार पेलूनी ढेकळाचा

घेतोय नवी उभारी


नात जन्मोजन्मीच मातीशी

सदा लागतो तिचा लळा

समद्या शिवारात फुलेल उद्या

हिरव्या पिकांचा रानमळा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational