Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

.प्रमोद घाटोळ

Inspirational

4  

.प्रमोद घाटोळ

Inspirational

आरसा

आरसा

1 min
387


⭕⭕⭕🔹🔹⭕⭕⭕


आरसा


जीवंतपणी भाव नाही

तेरवी कशाला

मेल्यावर घालतो

हार आरशाला~


डोळ्यात अश्रू नाही

रडणे कशाला

हंबरडा फोडतो कसा

विदुषकी दिसाला~


मुखी प्रेम नाही

मग माळ ती कशाला

शब्दं डंख भासे

जणू साप तो उशाला~


मानवता न कळली

धर्म सांगतो कशाला

फुकाचेच किर्तन

पोलके साधु दिसाला~


हातात कर्म नाही

अनंते दोष कशाला

पेटती मशाल हो

उजेड मागतो कशाला~


Rate this content
Log in