आकाश
आकाश


निळ्याभोर आकाशी शोभून दिसे पांढरे पांढरे ढग......
अथांग नभात उडतानाही दिसून येते शिस्तीने उडणारे हे खग.....
असते पंख मलाही तर उडले असते आकाशी.....
होता रात्र परतले असते घरट्यापाशी.....
पाहता आले असते जग मलाही उंचावरूनी....
जर मी धारण केले असते पक्षी योनी......
आकाशाच्या विशालतेची पाहिली असती परिभाषा....
पक्षी होवून फिरले असते चारही दिशा.....