थोर विरांगना
थोर विरांगना


⭕⭕⭕🔹🔹⭕⭕⭕
थोर विरांगना...
त्या थोर विरांगनेमुळे,नारी विमानातूनी फिरे||धृ||
सावित्रीचे सार सांगता
अश्रू ना आवरे
हृदयास जाई चिरे
सुटे जीवाला बावरे...
अंगावरती चिखल घेऊनी
दीन दलितांशी शिक्षण दिले
वाहू लागले झरे
प्रकाशली अंधारातील घरे...
शिवरायांशी गुरु मानीले
छाटली रुढी परंपरेची मुळे
सरले शुद्रांचे वावळे
क्रांतिसूर्य जोतीबामुळे...
ललनाही लांघून गेल्या
साता समुद्रापुढे
त्या बावनकशी सावित्रीमुळे
धन्य जाहले बहुजन खरे...
शिवा तुम्हां नम्र सांगतो
कानात घाला गुढे
झुकू नका अंधश्रद्धेपुढे
नका उडवू जुनेचं तुडतुडे...