वसंत होऊन ये..!
वसंत होऊन ये..!
तू औषध होऊन ये
उरातल्या जखमांचे..
बसले अनेक चटके
आपल्याच लाटांचे...
मखमली स्पर्शाची
मलमली ती ओढ तू
हलकेच ती प्रिती सये
हृदयातुनी मज सोड तू...
दर्द नाही अन् वेदनाही
परी विव्हळ जखमांचे
काळजाच्या रिक्तिमेला
आभाळ ते एकट्याचे...
ये ये धावत ये सये तू
शिशिराची पानगळ ही
होकाराचे बहार लेवून
ये होऊन वसंत तू...!

