सखी !
सखी !
हर्ष जाहला आनंद वाटला
तुला सखे बघ बघतांना
असा कसा ग सहज लागला
तूझा लळा, मला तूझा लळा
नदी किनारी तुला पाहिले
ऊनात गुलाबी विहरतांना
गवत फुलांशी सहज खेळता
मंत्र मुग्ध होऊन हसतांना
विसरून गेलो काठ नदीचा
विसरून गेलो मित्रांना
पाहता क्षणी हरवून बसलो
अशा तुझ्या ग मस्त अदा
गौर वर्ण कमनीय बांधा
नेत्र पाणेरी लकलकती
नाजुक ओठी हास्य मधुर
केस सोनेरी भुरभूरती
मनात वाटे बोलून तुजला
प्रेम आपले सांगावे
तुझ्या सोबती सदा रहावे
विसरूनी मित्र, जग सारे