STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Others Romance

4  

Abasaheb Mhaske

Others Romance

कळीन अलगद उमलायचं ...

कळीन अलगद उमलायचं ...

1 min
27.8K


कळीन अलगद उमलायचं ...

भ्रमरान तिजभोवती फिरायचं

रीत अशी हि जगावेगळी ...

प्रीत हिलाच का म्हणायचं ?


प्रेम असत अवघड ठिकाणच दुखणं ...

सांगताही येईना अन सहनही होईना

ओठात एक मनात वेगळाच असायचं

सांग प्रिये ! ...प्रीत हिलाच का म्हणायचं ?


प्रेमाच्या आणाभाका , भविष्याची स्वप्ने रंगवायची

रात्रंदिनी छळायचं ...खोटी- खोटी स्वप्न दाखवायची ..

अन एक दिवस अचानक निघून जायचं ठरवणं ...

तूच सांग ग ! खरंच असं असत का ग प्रेम करणं ?


झालं गेलं विसरून जा ... तिनं सहज म्हणायचं

सावर स्वतःला .. पण खरं सांग तू सावरशील

इतकं सोप्प असत का ग विसरणं प्रेमाला ...

क्षणात होत्याच नव्हतं करणं पटेल का ग मनाला ?


तुम्हा स्त्रियांना परिस्तिथीशी जुळवून घेणं ...

खूप छान जमतं कारण .. जन्मजात तुम्ही समंजस

तुम्ही रडून मोकळ्या तरी होता, नाही तर बोलून तरी ...

आम्हाला मात्र चार चौघातच काय एकांतातही शक्य होतं नाही


तू लाख म्हणशील ग झालं गेलं विसरून जा म्हणून ...

पण मन माझं मानायलाच तयार नाही ,काय करू ग ?

खात्री आहे मला तू सावरशीलच ग कसं तरी स्वतःला

मी मात्र आयुष्याचं मातेरं करून घेणार हमखास ,ठरलेलं...


Rate this content
Log in