STORYMIRROR

Umesh Sangvikar

Others

4  

Umesh Sangvikar

Others

उंच तुझा झोका..!

उंच तुझा झोका..!

1 min
229

उंच तुझा झोका उंच तुझी आशा 

जळो निराशा मुक्त व्हाव्या दिशा...! 


श्वास घे निर्भयाचा नको बावरी 

मंद सुगंधाचा ध्यास लागो जसा..! 


आज तुझी ही किती बंधन भाषा 

सोड घे भरारी पारिजाती दिशा...! 


तो अधीर सखा नि त्याची मनिषा

तूच हो प्रिये तूच हो त्याची निशा....! 


का करावी सांग ना बंधनभाषा 

उंच तुझा झोका उंच तुझी आशा....!! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन