खरे सांग सख्या
खरे सांग सख्या
हृदय ज्याची ग्वाही आज ही देतो
सांग सख्या तुझे ते प्रेम, खरे होते ना?
तुला दिलेले वचन मी आज ही पाळतो
सांग सख्या तुझे ते वचन, खरे आहे ना?
तुझ्या भेटीस आतुर मी...हे बोल तुझेच होते
सांग सख्या तुझे ते, मृदू बोल खरे होते ना?
माझ्या दुःखात तुझ्या पापण्या ओलावल्या होत्या
सांग सख्या तुझे ते, अश्रू खरे होते ना?
खऱ्या खोट्या भ्रमात, मी आज ही जगतो आहे.
सांग सख्या खरे... हे सारे खोटेच आहे ना?

