जादू व्हायचीच असेल...
जादू व्हायचीच असेल...
तू स्वप्न सांगावे आणि
ती माझी ध्येय बनावी
जादू व्हायचीच असेल
तर अशी काही व्हावी
मी आठवता तुला
तू समोर माझ्या असावी
जादू व्हायचीच असेल
तर अशी काही व्हावी
तू बोलत असताना
कधी सांगता नसावी
जादू व्हायचीच असेल
तर अशी काही व्हावी
तुझ्या सोबतच्या दिवसाला
रात्र कधी नसावी
जादू व्हायचीच असेल
तर अशी काही व्हावी
आयुष्यात माझ्या साथ
तुझी कायमची हवी
जादू व्हायचीच असेल
तर अशी काही व्हावी

