STORYMIRROR

Abhishek Panchal

Tragedy

3  

Abhishek Panchal

Tragedy

जरा चुकीचंच वाटलं...

जरा चुकीचंच वाटलं...

1 min
261

आनंद होईल वाटलं होतं, पण दुःखानेच तुला गाठलं

प्रेम करणं तुझ्यावर, मला जरा चुकीचंच वाटलं


धागे जुळतील वाटलं होतं, पण नातंच सारं फाटलं

व्यक्त करणं प्रेम, मला जरा चुकीचंच वाटलं


प्रेम वाटलं मला, ते प्रेम होतं कुठलं?

असं गृहीत धरणं तुला, मला जरा चुकीचंच वाटलं


होतं नव्हतं सुख, आता ते सुद्धा आटलं

तुला दुःखी करणं असं, मला जरा चुकीचंच वाटलं


तू नको नको म्हणता, प्रेम मनी माझ्या दाटलं

माफी मागणं आता, मला जरा चुकीचंच वाटलं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy