STORYMIRROR

Asha Khartade

Tragedy

4  

Asha Khartade

Tragedy

परतीचा पाऊस

परतीचा पाऊस

1 min
29K


परतीच्या पावसाने सारी

पिकं आडवी झाली 

आभाळाच्या बापा तुला

 दया कशी नाही आली। 

पर्‍हाटीचं बोंडे पाहून 

सुखावले होतं जरा मन

कसं रे फेडू आता 

सांग सावकाराचं ऋण 

व्याजावर व्याज चढून 

बघ मुद्दल वाढत चालली 

आभाळाच्या बापा तुला 

कशी दया नाही आली l

दिवाळीला लेकीला आणावं

वाटत होतं माहेरी 

कित्येक वर्षांपासून तिला 

केली नाही साडीचोळी

दिवाळीच्या सणावर अशी 

संक्रांत तू आणली 

आभाळाच्या बापा तुला 

कशी दया नाही आली।। 

सातबार्‍याच्या उताऱ्यावर पोराला

कॉलेजात प्रवेश मिळाला 

अंगावरच्या कपड्याशिवाय त्याला 

जमलं नाही रूपया द्यायला 

कुठशीक काम करुन म्हणं

तो खर्च भागवतो स्वतःचा

दोन चारशे रुपये पाठवून 

भार हलका करतो आमचा

सहा महिने झाले त्याची

खबरबात नाही विचारली

आभाळाच्या बापा तुला 

कशी दया नाही आली।। 

 ओल्या पर्‍हाटीकडं बघून 

काळीज बघ जळतंय

अच्छे दिनाचे सपान

चुलीच्या धुराचे विरतंय

चुलीत जाळायची लाकडंही

सारी ओली झाली 

आभाळाच्या बापा तुला 

कशी दया नाही आली।। 


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Tragedy