STORYMIRROR

Subhash Charude

Inspirational Tragedy

4  

Subhash Charude

Inspirational Tragedy

व्यथा

व्यथा

1 min
28K


भावाचे ना प्रेम मिळाले

बहिणीची ना छाया मिळाली

मनी मानसी कुढत राहिलो

माझी व्यथा ना कुणा कळाली

स्वार्थाने हे सगळे भरले

कामास्तव मज जवळ धरले

इच्छा मनीच्या पूर्ण होता

माझे अस्तित्व तिथे ना उरले

आशा मनीची धुळीस मिळाल

माझी व्यथा ना कुणा कळाली

घरासाठी मी झिजत गेलो

दिवसरात्र मी राबराबलो

सोडुन गेला पिता मजला

ज्याने त्याने स्वार्थ साधला

त्यांसाठी मी आता परका झालो

मज प्रेमाची ही शिक्षा मिळाली

माझी व्यथा ना कुणा कळाली

सर्वच अबोल झाले

मज पासुन खूप दूरच गेले

नात्यांचेही बंध निखळले

त्या स्मृती जेव्हा मनी दाटता

गालावरती अश्रू ओघळले

मज सेवेची ही भिक्षा मिळाली

माझी व्यथा ना कुणा कळाली


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Inspirational