STORYMIRROR

Subhash Charude

Inspirational

3  

Subhash Charude

Inspirational

प्रभू तु महान

प्रभू तु महान

1 min
13.8K


प्रभू तू महान

तू आमचा प्राण

जगासाठी तू जन्म घेतले

प्रेम करुणेचे तत्व मांडले

आम्हासाठी निज देहाचे

केलेस रे बलिदान

प्रभू तू महान

तू आमचा प्राण

तूच आमचा माता पिता

हात जोडतो देवा आता

आमच्या शिरावर हात तुझा

राहू दे रे छान

प्रभू तू  महान

तू  आमचा प्राण

जगासाठी तू एक आदर्श

होता तुझा परिस स्पर्श

तुझ्या स्पर्शाने दु:खीतांना

मिळाले जीवन दान

प्रभू तू  महान

तू  आमचा प्राण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational