.परतफेड
.परतफेड
मानवास सुख भोगण्याचे आहे किती वेड
त्याच्याच कर्मांची मिळते पुन्हा परतफेड
गतकाळात केलेली कर्म तो विसरुन जातो
त्या कर्म फळांचा जीवनात उदय होतो
जीवनात असू द्यावे सत्कर्माचे वेड
त्याच कर्माची मिळेल पुन्हा परतफेड
दु:ख कुणाचे वाटूनी द्या त्याला साथ
ठेवा त्याच्या डोक्यावर मायेचा हात
हृदयी असू द्यावे एकमेकांचे वेड
एकमेकांनाच करावी लागते पुन्हा परतफेड
भावनेच्या आहारी जाऊन नका हदय मोडू
जुळलेले नाते नका निर्दयपणे तोडू
नाते जोडण्याचे असू द्यावे वेड
जीवनातच मिळत असते पुन्हा परतफेड
जगी जगण्याचा आहे सर्वांना अधिकार
अट्टाहासाने भावनांचा करु नका धिक्कार
एकमेकांच्या भावना जपण्याचे असू द्या वेड
भावनाच करते भावनेला पुन्हा परतफेड
आपला विचार लादण्याचा नका प्रयत्न करु
जीवन सागरी तरु द्या ज्याचे त्याचे तारू
जीवन आनंदी करण्याचे असू द्यावे वेड
आनंदच आनंदाला देई पुन्हा परतफेड
पुन्हा परतफेड, पुन्हा परतफेड
