आपली माणस
आपली माणस
आपली माणस ही
आपली माणसच असतात
दु:खात सोबत आणि
सुखात हसतात
आपल्या माणसांची जेव्हा
आपणास सोबत मिळते
कठीण समयी त्यांची
आपणास किमत कळते
एकमेकांसाठी जी वाहुन घेतात
आपली माणस ही
आपली माणसच असतात
कधी रुसुन बसतात
तर कधी फुगतात
संकट समयी जे
आपणास आधार देतात
आपली माणसं ही
आपली माणसच असतात
स्वतः बरोबर आपणास
जे जाती पुढे घेऊन
स्नेह बंधनात स्वतः ला
जे घेती सर्व वाहुन
नात्यांचे बंधन जपून
नाती मनापासून पाळतात
आपली माणस ही
आपली माणसच असतात
