मृत्यूदान
मृत्यूदान
विरह तुझा मी या जीवनी
कसाच मी ग साहू
तुझ्या स्मृतींचे मेघ दाटूनी
गालावरती वाहे
जरी बाजुला उभी राहुनी
चोरुन मजला पाहे
सोडून मजला जाऊ नको ग
वाट कुणाची मी पाहू
हास्य तुझे ग पाहुन मजला
हर्ष मनाला होई
अग प्रिये मी तुझ्या वाचुनी
जगू शकत नाही
तुझ्या सवे ग सुख दुःखाचे
गीत कसे ग गाऊ
तुझ्याविना ग सखे साजणी
जीवन गीत अधूरे
तुझ्या सवे ग संसाराचे
स्वप्नच राही अपुरे
अथांग जगती कुठे कुठे मी
शोधित तुजला पाहू
हे ईश्वरा तुझ्याकडे रे
हिच प्रार्थना माझी
दे मृत्युचे दान मजला
कृपा होऊ दे तुझी
हीच याचना करितो तुजला
पसरुनी दोन्ही बाहू
कसाच मी ग साहू

