STORYMIRROR

Subhash Charude

Inspirational

3  

Subhash Charude

Inspirational

देह हा अनमोल

देह हा अनमोल

1 min
14.2K


परमेश्वराची सुंदर रचना

देह हा अनमोल

नको वाणीत तुझ्या कटुता

मधुर वचन आता बोल

सुंदर विश्व पाहण्यासाठी

डोळे तुला लाभले

नकोस ठेऊ वाईट दृष्टी

त्याहुन नेत्रहीन चांगले

श्रेष्ठ कर्म करण्यासाठी

दिले तुला दोन कर

श्रेष्ठ पुरुषार्थाने बनतो

अमर जगती नर

कानांनी तू ऐक चांगले

कान नको तू भरु

सत्य ऐकुनी एकीसाठी

आस जीवनी धरु

सुंदर तन दिले तुजला

दिले सुंदर मन

त्यामध्ये तू सतत ठेव

शुध्द विचारांचे धन

यश शिखरावर चढण्यासाठी

दिली तुला पाऊले

या सृष्टीच्या पटावरचे

तु आहेस बाहुले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational