नाही रे भेदभाव
नाही रे भेदभाव
हे ईश्वरा तुझ्या दरबारी
नाही रे भेदभाव
तू नाविक रे देवा माझा
मी तुझी रे नाव
सारे विश्व तुझीच रचना
नित्य स्मरतो तुझ्याच वचना
मज हदयात तूच देवा
मुखी तुझेच नाव
नाही रे भेदभाव
कर जोडूनी तुजपाशी येती
तुझ्या कृपेने कृतार्थ होती
आमच्या मनीच्या सर्व कामना
देवा तुला रे ठाव
नाही रे भेदभाव
करुणेचा तू सागर देवा
नाही मजला कुणाचा हेवा
तुझ्या कृपेचा दिपक देवा
आमच्या जीवनी लाव
नाही रे भेदभाव
जरीही भिन्न असल्या जाती
कितीही भिन्न असली नाती
तुझ्यापुढे हे एकच असती
दृष्टी तुझी समभाव
नाही रे भेदभाव
करतो आम्ही तुला प्रार्थना
पुर्ण होऊ दे मनोकामना
आर्त स्वरांनी करतो याचना
आमच्यासाठी धाव
नाही रे भेदभाव
नाही रे भेदभाव
