पत्नी
पत्नी
पत्नी रुपात लाभलीस तू
किती मी भाग्यवान
नाकावरती राग तुझ्या
तू आहेस गुणवान
माहेरचे बंध तोडूनी
तू आली मज जीवनात
हदयामधील प्रेम वाहते
जशा सरी श्रावणात
केसा मधला गजरा तुला
छान किती शोभतो
हदयामधील स्नेह सागर
तुझ्या डोळयातुनी वाहतो
जरी तू असली कडक लक्ष्मी
तुझ्या वाणीत गोडवा
सहवासाचे सुख तुझे
जसा दिवाळी अन पाडवा
कधी रुसते कधी फुगते
गंगा यमुना डोळ्यातुनी वाहते
मज प्रेमाच्या स्पर्शाने
क्षणात विरघळून जाते
हात तुझा ग हातात घेता
मनास किती आधार वाटे
बाहुत तुला उचलून घेईन
कितीही आले मार्गी काटे
