मित्रा तुझ्याचसाठी
मित्रा तुझ्याचसाठी
मनातील भावना ओठावर येती
जपून ठेवल्या मित्रा तुझ्याचसाठी
तुझ्यासवे बोलताना मन हलके होते
कसे जुळले आपले मित्रत्वाचे नाते
विचारांचे मेघ जेव्हा मनात दाटे
तुला सांगताना खुप आधार वाटे
मनातील भावना ओठावर येती
जपुन ठेवल्या मित्रा तुझ्याचसाठी
सुख दुःखाच्या क्षणांचा तूच एक साथी
माझे जीवन रहस्य मित्रा तुझ्याच हाती
सुख दुःखाच्या प्रसंगी कसा सामोरी जातो
तुला पाहुनी मला अभिमान होतो
मनातील भावना ओठांवर येती
जपून ठेवल्या मित्रा तुझ्याचसाठी
मनात पित्यासाठी तू श्रावण वाटे
सुखी संसारास्तव दिन रात झटे
जरी दुःखाची किती वादळे आली
हास्य दिसते तरीही तुझ्या गाली
मनातील भावना ओठावर येती
जपून ठेवल्या मित्रा तुझ्याचसाठी
