प्रित गंध
प्रित गंध
पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पडला मंद
माझ्या हृदयी फुलला ग
तुझ्या प्रितीचा गंध
या प्रितीच्या गंधाने
मन माझे मोहरुन आले
तुला पाहता पहिल्यांदा
हे हदय तुझेच झाले
तुला बघत राहण्याचा मला जडला छंद
माझ्या हृदयी फुलला ग
तुझ्या प्रितीचा गंध
प्रित तुझी अन माझी
जगा वेगळी राणी
हात हाती घेऊनिया
गाऊ प्रितीची गाणी
छान दिसते जेव्हा तू गाली हसते मंद
माझ्या हृदयी फुलला ग
तुझ्या प्रितीचा गंध
हदया मधिल सुप्त भावना
ओठावरती आल्या
रुप घेऊनी त्या भावना
माझ्या कविता झाल्या
मी जरीही फुल असलो तू त्याचा सुगंध
माझ्या हृदयी फुलला ग
तुझ्या प्रितीचा गंध

