ईश्वरा तू
ईश्वरा तू
हे ईश्वरा
जगण्याचा आधार तू
मनातील विचार तू
भावनेतील भाव तू
सागरातील नाव तू
शिंपल्यातील मोती तू
हृदयातील प्रिती तू
फुलातील सुगंध तू
कलेतील छंद तू
चित्ता मधिल चिंतन तू
हृदयातील स्पंदन तू
शरीरातील चेतना तू
जीवनातील प्रेरणा तू
आईची ममता तू
समतेतील समता तू
विजयातील जीत तू
संगीतातील गीत तू
विश्वाचे वर्चस्व तू
माझे सर्वस्व तू
भक्ती मधले गाणे तू
माझा पंचप्राण तू
