STORYMIRROR

Murari Deshpande

Inspirational

4  

Murari Deshpande

Inspirational

आकाशवाणी

आकाशवाणी

2 mins
529

विसर्जनाच्या आदल्या रात्री झाली आकाशवाणी

खबरदार जर वाजवाल गलिच्छ गटारगाणी

जे ऐकून खाली जाईल माय भगिनींची मान

त्यात कसली मर्दानगी त्यात कसली शान

 

अनेक वर्षे झाली आता संपली सहनशक्ती

चिमणी, पोपट, दांडा गीते ऐकण्याची माझ्यावर सक्ती

सैराट, झिंगाट, मोकाट तुम्ही आशिर्वाद काय देऊ

असेच बिघडत राहा भक्तांनो बाय बाय, चला येऊ?   


खरा भक्त, हंगामी भक्त अन् ओळखतो मी लबाड

कोण करतो पदरमोड अन् कोण लाटतो घबाड

तुम्ही वागणार वेडेवाकडे तरीही मी पावावे?

तुमच्या पाप-पुण्याचे हिशेब कधी लावावे?

 

जाता जाता सांगतो ऐका मोलाच्या गोष्टी चार

तसे वागलात तर कृपेची कायम अमृतधार

ढोल-ताशे, लेझीम जिथे फिरते लाठीकाठी

खंबीरपणे मीही उभा राहीन त्यांच्यापाठी


सपासप फिरणारा दांडपट्टा अन् जिथे तलवारबाजी

डोळे भरून पाहतो मीही मर्द लेकरे माझी


संस्कृतीचा उत्सव माझा विकृतीला नकोच थारा

बीभत्सपणा टाळला नाही तर चढणारच माझा पारा


स्वातंत्र्याच्या संग्रामातही उत्सव माझा लढला

’लोकमान्य’ता मिळाली म्हणून यशाच्या शिखरी चढला


निर्व्यसनी अन् बलदंड पिढीचा मी पण एक चाहता

मर्दानी खेळांनी गाजवा रिंगण वाट कसली पाहता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational