आपला महाराष्ट्र
आपला महाराष्ट्र


महाराष्ट्र , मराठी माणूस
जेंव्हा केंव्हा काही करतो
तेंव्हा तेंव्हा तो असे करतो
एकच दाव, असा लावितो
एकच तीर, असा सोडतो कि
जगज्जेता, जगविख्यात होतो
साऱ्या जगाचा आदर्श होतो
अवघे जगच जिंकून घेतो
मग ते क्षेत्र , लक्ष्य कुठलेही असो
जेंव्हा केंव्हा, ते साधना, तप, ज्ञान
प्रेम, भक्ती, ममत्व, कवित्व, अभंग वाणी
मानवता असते तेंव्हा तो,
सकलांची ज्ञानोबा माऊली होतो
परंपरा, गुरु भक्ती, ईशसेवा,
करुणा, प्रबोधन, परिवर्तन,
भजन किर्तन, भारुड असते
तेंव्हा तो,
एकनाथ, नामदेव, तुकाराम होतो
भक्ती, गुरुसेवा, जनसेवा
संत वारसा असते
तेंव्हा तो गोरोबा, सावता,
तुकडोजी, वारकरी होतो
जेंव्हा केंव्हा,
संस्कार, दूरदृष्टी
संकल्प, अनुशासन
नव निर्माण, ध्येय
न्याय, नीती,कतृत्व
मातृत्व असते तेंव्हा....
राजमाता जिजाऊ होते
मातृभूमी, स्वतंत्रता,
स्वराज्य, न्याय, नीती,
स्वाभीमान, लोकराज्य
असते तेंव्हा तो....
छत्रपती शिवराय होतो
मैत्री, निष्ठा, समर्पण,
वीरता, धाडस असते
तेंव्हा तो मावळा होतो
शूर सेनानी, सामर्थ्य, अजेय, धर्मवीर,
ज्ञान, कला, स्वराज्य रक्षण
असते तेंव्हा तो....
छत्रपती शंभूराजे होतो
जेंव्हा केंव्हा
राज्य, स्वराज्य, स्वभीमान,
वारसा, रयतेचे रक्षण असते
तेंव्हा ती........वीरांगणा
येसूबाई, ताराराणी,
उमाबाई साहेब होते
अजिंक्य पराक्रम वीरता,
कुशल योद्धा, नायक
सीमापार झेंडा रोवायचा असतो,
तेंव्हा तो.....पेशवा सरकार
वीर बाजीराव होतो
परशत्रु दमन, झुंज, देश रक्षण,
शौर्यबलिदान असते तेंव्हा तो......
सदाशीव भाऊ, व
िश्वास राव,
मल्हारराव महादजी वीर मराठा होतो
जेंव्हा केंव्हा,
स्वतंत्रता संग्राम, उठाव , क्रांती
सर्मपण असते तेंव्हा तो.....
उमाजी नाईक, लहुजी वस्ताद,
नानासाहेब, तात्या टोपे,
वीर मर्दानी राणी लक्ष्मीबाई होतो
जन जगृती, क्रांती, स्वातंत्र्य लढा
स्वराज्याधिकार असते तेंव्हा तो.....
वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक
चापेकर बंधू, वीर सावरकर,
हुतात्मा राजगुरू होतो
समाज शिक्षण, प्रबोधन, सुधार, सत्याग्रह
आंदोलन असते तेंव्हा तो.......
गाडगेबाबा, आ. विनोबा भावे
गोखले, आगरकर, रानडे होतो
जेंव्हा केंव्हा,
समानता, अधिकार, न्याय, शिक्षण
परिवर्तन, लढा असतो तेंव्हा
रा. शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव,
अहिल्याबाई, रमाबाई, सावित्रीबाई
म. ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होतो
संयुक्त महाराष्ट्र, मराठी अस्मिता असते
तेंव्हा तो माडखोलकर, प्रबोधनकार,
आ. अत्रे, शा. अमर शेख, शा. अण्णाभाऊ साठे
बाळासाहेब ठाकरे होतो.
जेंव्हा केंव्हा,
गीत संगीत कला, असते तेंव्हा...
गंधर्व, सवाई गंधर्व, बालगंधर्व, भीमसेन,
सुमनताई, आशाताई, लतादीदी होतो
दादासाहेब फाळके, शोभना समर्थ,
स्मिता पाटील, व्हि शांताराम
सी रामचंद्र, पी सावळाराम होतो
जेंव्हा केंव्हा,
खेळ, स्पर्धा असते
खाशाबा, धनराज,
सुनिल, सचिन होतो
जेंव्हा केंव्हा,
उद्योग, व्यापार, व्यवसाय असते तेंव्हा...
किरलोस्कर, ओगले, गरवारे,
कल्याणी, हनुमंतराव, जयकुमार पठारे,
कामत, वीणा पाटील,
प्रदिप मराठे(कॉटन किंग) होतो.
उत्तुंग, अजिंक्य, अग्रेसर,
विश्र्वविख्यात, विश्र्वविजेता
आपला माणूस, मराठी माणूस
आपला महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र