गुपित
गुपित
थांब ना जराशी समिप आज तरी
खोलना मनिचे गुपित आज तरी
ऐक ना मनाचे तुझ्याच थोडे तरी
होऊदे मोकळे भेटीत आज तरी
पाहुदे मला हि गुलाब गालावरी
खुलुदे पाकळी गालात आज तरी
खुलावे हलके ते स्मित ओठावरी
रंगुदे मला हि प्रितीत आज तरी
पाहुदे काहीसे डोळ्यात आता तरी
बघ ना माझ्या हि डोळ्यात आज तरी
पहातो वाट मी रोजच वाटे वरी
सोड ना अबोला साथीत आज तरी
वाहु दे प्रेमाचा सुगंध माझ्या साठी
मी तुझा तु माझी प्रेमात आज तरी
आहे ना तुझ्या हि जे आहे माझ्या मनी
येशील ना जरा मीठीत आज तरी
होशील ना माझी खुषीत आता तरी
दोघात कशाला गुपित आज तरी
जाणते तुहि हे लपवु कसे किती
गुपित ना उरे गुपित आज तरी

