STORYMIRROR

Vijay Sanap

Classics Drama

3.5  

Vijay Sanap

Classics Drama

लेक लाडकी

लेक लाडकी

1 min
35.4K


लेक लाडकी बापाची

तीच बापाचा आधार

नाते जोडी दोन घरी

करी कुळाचा उध्दार ।।


लाड बाप करी तिचे

घरी दारी तिचा लळा

चाल तिची छुमछुम

तिच्या पायामधी वाळा ।।


लेक लहानाची मोठी

लय सुखात वाढली

नाही कळाले बापाला

कधी उंबरा चढली ।।


काम करीत बापाची

घेई रोज ती काळजी

ठेवी लक्ष खाण्याकडे

खाऊ घाली फळभाजी ।।


आलं लेकीचं लगीन

काढी सावकारी रिनं

त्याच्या काळजाला घोर

बाप करी कन्यादानं ।।


लेक नांदाया निघाली

माय रडे मांडवात

करा लेकीचा सांभाळ

बाप जोडी दोन्ही हात ।।


आला दिवाळीचा सण

आस लेकीची लागली

सर्जा राजा संगतीला

गाडी बापाची सजली ।।


स्नान घालते भावाला

ताई ताट ओवाळूनं

मही लाडाची रे लेक

बाप करी बोळवण ।।


लेक आली माहेराला

बाप भूषण सांगतो

कर लेकीच रे भलं

वर देवाला मागतो ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics