STORYMIRROR

Vijay Sanap

Inspirational Others

4  

Vijay Sanap

Inspirational Others

मतदार राजा जागा हो

मतदार राजा जागा हो

1 min
863

मतदार राजा जागा हो

निवडणूकीची सुटली हवा

विचार करा गड्यांनो

निवडून आता कुणाला द्यावा ।।

चार टवळे जमवून

हात जोडीत फिरतात

कमरे पासून वाकून

नमस्कार करतात  ।।

आता सर्वांना आठवते

आई बाई आक्का

आजीलाही सांगतात

मलाच मारा शिक्का ।।

भाऊ दादा करत

फिरतात गाव भर

मतासाठीच फक्त

करतात मर मर ।।

घोटभर पिवून

विकू नका मत

पाच वर्ष तुमची

होईल फसगत ।।

विचार करून तुम्ही

निवडून द्या उमेदवार

पाच वर्षात विकासाचा

करेल मार्ग  पार ।।

आयाराम गयाराम

बोकाळलेत यंदा

कोणाचाच चालेना

तेजी मधी धंदा ।।

मतदारांच्याच हाती

आहे त्यांचा धागा

कोणाला कुठली

दाखवायची जागा ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational