STORYMIRROR

Sunita Ghule

Drama

4.8  

Sunita Ghule

Drama

ओवी

ओवी

1 min
1.3K


पहिली माझी ओवी गं

माय जन्मदात्रीला

नऊ मास वाढवूनी

जन्म माझा प्रसवला ।१।


दुसरी माझी ओवी गं

मातृभूमी जननीला

साकारिले स्वप्नाला नि

आत्मा माझा गं पोसला।२।


तिसरी माझी ओवी गं

ज्योतिबाच्या सावित्रीला

लेकींसाठी शिक्षणाचा

पाया तिने हो रचिला।३।


चौथी माझी ओवी गं

अहिल्येच्या दातृत्वाला

मुखी घास भरवूनी

वसा दानाचा तो दिला।४।


पाचवी माझी ओवी गं

राणी जिजाऊ मातेला

शिवराय घडवूनी

राष्ट्रमान जागविला।५।


सहावी माझी ओवी गं

ज्ञानेश्वर तुकोबाला

संतपाया रचयिला

आंतरात्मा जागा केला।६।


सातवी माझी ओवी गं

पंढरीच्या विठ्ठलाला

भक्तांसाठी धावूनिया

प्रतिपाळ त्याने केला।७।


आठवी माझी ओवी गं

काव्यमय प्रतिभेला।

शब्दाभूती साठवूनी

जगण्याचा मार्ग दिला।८।


नववी माझी ओवी गं

रसिकजना स्फुर्तीला

कौतुकाची थाप दिली

साहित्यिक गौरविला।९।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama